आयसिसशी संबंध असल्याचा संशय, जिल्हा परिषद शिक्षक ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 07:30 AM (IST)
हिंगोली : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून हिंगोलीतून एका जिल्हा परिषद शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रईसुद्दीन सिद्दीकी असं त्याचं नाव असून महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. हिंगोलीतील आजम कॉलनीमधून रईसुद्दीन सिद्दीकीला एटीएसने ताब्यात घेतलं. अधिक चौकशीनंतर त्याला अटक होण्याची शक्यता आहे. रईसुद्दीन सिद्दीक मूळचा परभणीचा असून तो सध्या आझम कॉलनीत राहत होता.