मुंबई: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे.

केवळ सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हं आहेत.

तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणं जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.

त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी या तीन पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित आहे.

मात्र ज्या जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत, अशा जिल्ह्यात भाजप फायदा उचलण्याच्या प्रयत्नात असेल.

 जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!


काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते.

मात्र काही जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे आदेश स्थानिक शिवसेना नेत्यांनी अमान्य केले आहेत. ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याशी युती करण्यास स्थानिक आमदारांनी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणत्या जिल्ह्यात शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद?

  • नांदेडमध्ये शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण असा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे काँग्रेसशी युती करण्यास चिखलीकरांचा नकार.



  • कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध स्थानिक काँग्रेस नेते आणि माजी आमदार पी एन पाटील यांच्यात टोकाचे वाद.



  • उस्मानाबादमध्ये शिवसेना खासदार रवी गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादी वाद, शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंत आणि खासदार रवी गायकवाड यांच्यात तीव्र मतभेद. या मतभेदामुळे युतीसाठी नकार.



  • नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत हे कोडं आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. भाजपचे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन विरुद्ध दादा भुसे वाद आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी शिवसेना कोणाची मदत घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.



  • मात्र सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप एकत्र. यामुळे सेनेत अंतर्गत वाद.



  • बीडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी आहे. पंकजा मुंडे यांची उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी आग्रही मागणी. जुन्या नात्यांचा दाखला दिल्याची सूत्रांची माहिती. यापूर्वीही लोकसभा पोटनिवडणुकीत प्रितम मुंडेविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे बीडमध्ये भावनिक राजकारण पाहायला मिळतंय.



  • बीडमध्ये नव्याने शिवसेनेत आलेले माजी आमदार बदामराव पंडित यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत जाण्यास तीव्र विरोध.



  • तर सांगलीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते पतंगराव कदम विरुद्ध सेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यात वाद आहे. त्यामुळे इथेही तीनही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.


संबंधित बातम्या

 जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!


औरंगाबाद जिल्हा परिषदेत अखेर काँग्रेस-शिवसेनेची युती!

 

अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सस्पेंस अजूनही कायम

 

जालन्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

 

झेडपीत भाजपला रोखणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र!

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नाशिक झेडपीत शिवसेना-राष्ट्रवादी युती?