मुंबई : मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडेल. 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे. या सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी दहा वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी : रायगड- 71 रत्नागिरी- 64 सिंधुदुर्ग- 70 नाशिक- 68 पुणे- 70 सातारा- 70 सांगली- 65 सोलापूर- 68 कोल्हापूर- 70 अमरावती- 67 गडचिरोली- 68
सरासरी- 69.43 ------------
लाईव्ह अपडेट : नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दुपारी 3.30 पर्यंत 49.67 टक्के मतदान - 3.30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 60.34 टक्के मतदान कोल्हापूर जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितीसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 3.30पर्यंत सरासरी 60.34 टक्के इतके मतदान झाले असून तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
शाहुवाडी - 57.80 टक्के, पन्हाळा - 61.05 टक्के, हातकणंगले - 57.48 टक्के, शिरोळ - 57.08 टक्के, कागल - 67.63, करवीर - 59.62 टक्के, गगणबावडा - 80.54 टक्के, राधानगरी - 69.19, भूदरगड - 59.89, आजरा - 60.01, गडहिंग्लज - 54.84, चंदगड - 59.98 इतके मतदान झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान टक्केवारी (3.30 पर्यंत) - यवतमाळ- 54.02 टक्के
- कोल्हापूर- 60.34
- पुणे ग्रामीण- 51.55
- नाशिक- 49. 67
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान टक्केवारी (1.30 पर्यंत) - रायगड- 44.58
- रत्नागिरी- 38.56
- सिंधुदुर्ग- 45.27
- नाशिक- 34.33
- पुणे- 39.68
- सातारा- 42.23
- सांगली- 38.28
- सोलापूर- 36.81
- कोल्हापूर- 43.59
- अमरावती- 32.02
- गडचिरोली- 44.67
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान टक्केवारी (1:30 वा. पर्यंत)त तालुकानिहाय मतदान - शाहुवाडी - 38.08
- पन्हाळा - 38.36
- हातकणंगले - 41.59
- शिरोळ - 40.81
- कागल - 51.17
- करवीर - 45.07
- गगणबावडा - 67.36
- राधानगरी - 49.01
- भूदरगड - 43.87
- आजरा - 45.52
- गडहिंग्लज - 37.56
- चंदगड - 46.92
सरासरी 43.59 टक्के पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान टक्केवारी (1:30 वा. पर्यंत) तालुकानिहाय मतदान : - जुन्नर- 23.11
- आंबेगाव- 31.89
- खेड - 43.51
- वडगाव मावळ - 42.17
- हवेली - 33.73
- दौंड - 40.64
- बारामती - 44.61
- इंदापूर - 25.87
- भोर - 51.62
- मुळशी - 39.87
- शिरूर - 42.36
- पुरंदर- 51.43
- वेल्हा- 45.29
सरासरी : 39.68 टक्के आत्तापर्यंतच्या झालेल्या मतदानात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्याने आघाडी घेतली असून 51.43 टक्के मतदान झालं आहे. तर सर्वात कमी जुन्नर 23.11 टक्के मतदान झालं आहे. नाशिक जिल्हा परिषदेसाठी 1.30 पर्यंत 28 टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान टक्केवारी (11.30 पर्यंत) : - रायगड- 27.43
- रत्नागिरी- 29.07
- सिंधुदुर्ग- 28.36
- नाशिक- 18.32
- पुणे- 25.89
- सातारा- 25.71
- सांगली- 23.00
- सोलापूर- 21.94
- कोल्हापूर- 26.87
- अमरावती- 17.53
- गडचिरोली- 27.88
एकूण सरासरी : 24.78 टक्के सोलापूर जिल्हा परिषद मतदान टक्केवारी (11.30 पर्यंत ) : - करमाळा 26.25
- माढा 22.29
- बार्शी 26.08
- उत्तर सोलापूर 23.07
- मोहोळ 23.96
- पंढरपूर 17.46
- सांगोला 17.69
- मंगळवेढा 16.70
- दक्षिण सोलापूर 21.52
- अक्कलकोट 23.39
- माळशिरस 23.22
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात मतदान यंत्र बंद, सकाळपासून दुसऱ्यांदा मतदान यंत्रात बिघाड, मतदार रांगेत ताटकळत उभे, दुरुस्तीला विलंब होत असल्याचा मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांचा खुलासा.
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याची भाजप उमेदवाराची तक्रार, एक बटन दाबल्यास दुसऱ्याच उमेदवाराला मत जात असल्याचा दावा, भाजप उमेदवार चंद्रकांत पिंगळे यांची तक्रार, मतदान केंद्रावरील मतदान सध्या बंद
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान टक्केवारी (स. 9.30 पर्यंत) - रायगड- 10.55
- रत्नागिरी- 12.72
- सिंधुदुर्ग- 12.29
- नाशिक- 7.16
- पुणे- 11.03
- सातारा- 9.46
- सांगली- 9.03
- सोलापूर- 7.97
- कोल्हापूर- 11.75
- अमरावती- 6.33
- गडचिरोली- 9.89