पंढरपूर : मतदारांना पैसे वाटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर परिसरातील ही घटना आहे.


मंगळवेढा परिसरात मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होते. कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी 67 हजार 100 रुपये आणि मतदार याद्या जप्त केल्या आहेत.

दरम्यान मतदानाच्या दिवशीच पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. 11 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांसाठी आज राज्यात मतदान होत आहे.

जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांचाही समावेश आहे. अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मतदान ओळखपत्र नसेल तर काय करायचं?


महापालिकेसाठी प्रभाग पद्धतीत कसं मतदान करायचं?


दिवस मतदारराजाचा! महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी आज मतदान