बीड : सांगली कोल्हापूरसह सातारा आणि कोकणात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घर वाहून गेली. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी एकवटले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्रित येत त्यांचा एक दिवसाचा पगार हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना या निर्णयायाची माहिती दिली आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद अभियंता संघटना या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2019 च्या पगारातून एक दिवसाचा पगार मदतकार्यासाठी मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले आहे.
राज्यात एकूण 22 हजार 388 ग्रामसेवक आहेत, यांच्याकडून तीन कोटी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यामध्ये तीन लाख कर्मचारी आहेत, त्यांच्या एक दिवसाच्या पगारातून किमान 45 कोटी रुपये, हे या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले जाणार आहेत.
पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी 45 कोटी देणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2019 12:26 PM (IST)
सांगली कोल्हापूरसह सातारा आणि कोकणात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घर वाहून गेली. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी एकवटले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -