मुंबई: राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. त्यांचा निकाल गुरुवारी जाहीर होत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. प्रत्येक गण आणि गटाची एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी टेबलची मांडणी करण्यात आली.

साधारणपणे एका जिल्हा परिषद गटात २० हजार मतदार असतात. एका गटात दोन पंचायत समिती उमेदवार आहेत.

एकूण मतदानापैकी सुमारे ७० टक्के मतदान झाल्याने,एका गटाचा निकाल येण्यासाठी १४ हजार मतांची मोजणी केली जाणार आहे.

यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत बरचं चित्र स्पष्ट झालेलं असेल.

यावेळी झालेल्या चौरंगी लढती पाहता, विजयी उमेदवारांच्या विजयाचा लंबक इकडून तिकडे जाताना दिसू शकतो. विजयी मतांचा फरक मोठा नसेल. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

कोणत्या जिल्हा परिषदांचा निकाल?

  • रायगड

  • रत्नागिरी

  • सिंधुदुर्ग

  • पुणे

  • सातारा

  • सांगली

  • सोलापूर

  • कोल्हापूर

  • नाशिक

  • जळगाव

  • अहमदनगर

  • अमरावती

  • बुलडाणा

  • यवतमाळ

  • औरंगाबाद

  • जालना

  • परभणी

  • हिंगोली

  • बीड

  • नांदेड

  • उस्मानाबाद

  • लातूर

  • वर्धा

  • चंद्रपूर

  • गडचिरोली


जिल्हा परिषदेतील सध्याचं पक्षीय बलाबल


सोलापूर- 68
राष्ट्रवादी- 35
काँग्रेस- 19
शिवसेना-01
भाजप -02
शेकाप -03
आघाडी- 10

नांदेड -63
काँग्रेस - 25
राष्ट्रवादी-18
शिवसेना- 09
भाजप- 04

बीड - 59

राष्ट्रवादी २७

भाजप २६

शिवसेना ०२

काँग्रेस ०१

रासप ०१

शिवसंग्राम ०१

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला अपात्र ठरल्याने एक जागा रिक्त

औरंगाबाद- 60

काँग्रेस - 18

राष्ट्रवादी - 10

शिवसेना - 15

भाजप - 06

मनसे - 08

अपक्ष - 03

परभणी- 52

राष्ट्रवादी- 25

सेना- 11

काँग्रेस- 8

भाजप- 2

रासप- 1

शेतकरी कामगार पक्ष- 1

अपक्ष- 4

जालना -55

राष्ट्रवादी-16

भाजप-15

शिवसेना-15

काँग्रेस-3

मनसे-1

अपक्ष-5

हिंगोली- 50

शिवसेना  27

काँग्रेस 10

राष्ट्रवादी 9

अपक्ष 4

नाशिक- 73

राष्ट्रवादी काँग्रेस- 27

शिवसेना- 20

काँग्रेस- 14

भाजप- 3

माकप- 3

मनसे- 2

अपक्ष- 4

जळगाव- ६८

भाजप- २४

राष्ट्रवादी- २०

शिवसेना- १४

काँग्रेस- १०

अहमदनगर-७५

राष्ट्रवादी- ३२

काँग्रेस- २८

सेना- ६

भाजपा- ६

अपक्ष- ३