Yugendra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा दोन महिन्यांपूर्वी पार पडल्यानंतर आता युगेंद्र पवार सुद्धा विवाह बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये फोटो शेअर करत दिली आहे. युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ही मुंबईची असून तिचं शिक्षण परदेशामध्ये झालं आहे. तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतलं आहे.
घरगुती पद्धतीने साखरपुडा झाली दोघांचा साखरपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुडा झाल्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा झाला होता. यावेळी पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. दरम्यान युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय? अशी विचारणा केली होती. आजोबांचा सल्ला मनावर घेत युगेंद्र पवार यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस मधून दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.
कोण आहे ऋतुजा पाटील?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे जिरंजीव जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता. या साखरपुड्याच्या निमित्ताने राजकारणामुळे दुभंगलं असताना एकत्र आले होते. सुप्रिया सुळे यांनी साखरपुडा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या