Gautami Patil : हिंगोलीमध्ये आज नवरात्रीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख यांच्या वतीने नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटील स्टेजवर येण्यापूर्वीच तरुणांनी मोठा गोंधळ घातला होता. दरम्यान या गोंधळाला पांगविण्यासाठी पोलिसांच्या वतीने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील लोककलेमध्ये लावणी प्रकाराला मोठे महत्त्व आहे. गेली अनेक वर्ष हा प्रकार सातत्याने सुरु आहे. आजही महाराष्ट्रात लावणी महोत्सव भरताना दिसून येतात. सध्या लावणीमुळे गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात फेमस झालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला मोठी मागणी आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: