नागपूरमध्ये चाकून वार करत तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2017 05:46 PM (IST)
नागपूर : नागपूरच्या पवननगरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. लिकेश साठवणे असं या हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. चाकूनं वार करत लिकेशची हत्या करण्यात आली आहे. लिकेश साठवणे हा तरुण रिक्षाचालक होता. 9 एप्रिल 2017 पासून तो बेपत्ता होता. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये लिकेश बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. लिकेशची हत्या एका महिलेनं भाडोत्री गुंडाकडून केल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूरमधील पवनशक्तीनगरशेजारील निर्जन भागात चाकून हत्या करुन त्याचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आली होती. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत हत्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बातम्या : नागपुरात गेल्या 24 तासात 5 हत्या नागपुरात 12 तासात हत्येच्या चार घटनांमुळे खळबळ