जळगाव : वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना जळगावात घडली. 27 वर्षीय योगेश भोरे याचा धबधब्याखाली मृत्यू झाला. योगेश हा चाळीसागावातील हिरापूर रोडवरील ग्रामशक्ती फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी 10 मित्रांसोबत योगेश धबधब्याच्या ठिकाणी गेला होता.
नांदेडमधील बिलोलीचा रहिवाशी असलेला योगेश भोरे हा तरुण चाळीसगाव येथील हिरापूर रोड वरील ग्रामशक्ती फायनान्स मध्ये नोकरीस होता. त्यामुळे तो चाळीसगाव येथेच राहत असे. 21 जुलै 2017 रोजी त्याचा वाढदिवस असल्याने त्या वाढदिवसानिमित्त रविवारी सुट्टी असल्याने कामावरील जवळपास 10 मित्रांसमवेत चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात असलेल्या पितळखोऱ्या जवळील धवलतीर्थ कुंड धबधब्या जवळ फिरावयास गेला होता.
योगेश धबधब्याच्या पाण्याच्या धारेखाली बसलेला असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा प्रवाह जोरात आल्याने तो कुंडात पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला. शिवाय, योगेश पाण्यातील कुंडात बुडाला.
कुंडात खोल पाणी असल्यामुळे तो लवकर सापडला नाही. शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने अखेर वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे पाचारण करण्यात आले.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार संजय काळे, हवालदार दिलीप रोकडे, पोलीस नाईक दत्तात्रय महाजन, नितीन आमोदकर, वन विभागाचे कैलास राठोड, खडकी बु चे शकील खान, गोकुळ कोल्हे व पाटणा गावातील ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह अथक परिश्रामांनंतर 7 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला.
धबधब्याखालील बर्थडे सेलिब्रेशन तरुणाच्या जीवावर बेतलं!
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
23 Jul 2017 09:32 PM (IST)
वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना जळगावात घडली. 27 वर्षीय योगेश भोरे याचा धबधब्याखाली मृत्यू झाला. योगेश हा चाळीसागावातील हिरापूर रोडवरील ग्रामशक्ती फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी 10 मित्रांसोबत योगेश धबधब्याच्या ठिकाणी गेला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -