परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात

Continues below advertisement
परभणी : परभणी जिल्ह्यातून आणखी एका आयसिस संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन 24 वर्षीय शेख इकबाल शेख कबीर अहमद या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. परभणी शहरातील मदिना नगर भागात एटीएसने ही कारवाई केली.   याआधीही आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन परभणीतून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. शाहीद खान आणि नासिरबेन असं याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. या दोघांच्या चौकशीनंतर परभणीत एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे.   विशेष म्हणजे, शाहीद, नासिरबेन आणि शेख इकबाल शेख कबीर अहमद हे तिघेही मित्र आहेत. शेख इकबाल शेख कबीर अहमदवरील कारवाईला एटीएसनेही दुजोरा दिला आहे
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola