Nashik Crime : नाशिकरोड चेहडी पुलाच्या (Nashik Road) शिव मंदिराजवळ एका 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केल्याची घटना आज सकाळी घडली. आज सकाळी घरातून बाहेर पडताना पत्नीला मंदिरातून दर्शन घेऊन येतो, म्हणत घराबाहेर पडला. पळसे-चेहेडी गावानजीक असलेल्या महादेव मंदिराजवळ जात गावठी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अल्पवयीन मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत आत्महत्येसारखे (Suicide) टोकाचे पाऊल उचलले जात आहे. रोजच पोलिसांच्या दैनंदिन अहवाल चार ते पाच नागरिकांनी जीवन संपवल्याचे समोर येत असते. अशातच नाशिक येथील एका कंपनी कामगार तरुणाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप नाना शहाणे असे या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा तरुण चासगाव येथील असून आज सकाळी घरातून बाहेर पडताना बायकोला मंदिरातून दर्शन करून येतो म्हणत, नाशिकरोड (Nashik Road Police) परिसरातील पळसे भागातील शिव मंदिराजवळ गावठी कट्ट्याने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.


संदीप हा सातपूरच्या एमआयडीसीत (Satpur MIDC) एका कंपनीत कामाला होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न (Marriage) झाले होते. मात्र आज सकाळी घराबाहेर पडत नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदीजवळील भैरवनाथ मंदिराजवळ संदीप याने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याचबरोबर घटनास्थळावरून गावठी कट्टा जप्त केला आहे. संदीप याने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आले नसून तसेच  त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठून? हा गंभीर प्रश्न देखील पोलिसांसमोर उभा राहतो. 


कुटुंबियांना जबर धक्का 


नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. संदीप सहाणे याने आत्महत्या का केली, याबाबतचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून वर्षभरापूर्वीच संदीपचे लग्न झाले असल्याने अशातच त्याने आत्महत्या का केली असावी असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.