नाशिक : गॅस सिलेंडरची नळी तोंडात धरुन उद्योजक उदय खरोटे यांचा मुलगा अजिंक्य याने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगरमध्ये ही घटना घडली. अजिंक्य खरोटे हा 25 वर्षांचा होता.
अजिंक्य रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात एकटाच होता. त्यावेळी त्याने एलपीजी गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर सुरु केले आणि गॅसची नळी तोंडात धरुन आपली जीवनयात्रा संपवली.
काही वेळाने आई-वडील घरी परतले, त्यावेळी अजिंक्यने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आई-वडिलांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी अजिंक्यला मृत घोषित केले.
अजिंक्यच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. गंगापूर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच, आत्महत्येच्या या भयंकर स्वरुपाने नातेवाईकांसह पोलिसही चक्रावून गेले आहेत.
अजिंक्यचे वडील उदय खरोटे हे नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक आहेत. ‘निमा’ या नाशिकमधील उद्योजकांच्या संघटनेचे ते सरचिटणीसही आहेत. एमआयडीसीत त्यांची स्वत:ची कंपनी आहे. तिथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेला अजिंक्य त्यांना मदतही करायचा.
गॅस सिलेंडरची नळी तोंडात धरुन उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2018 06:42 PM (IST)
अजिंक्यच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. गंगापूर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच, आत्महत्येच्या या भयंकर स्वरुपाने नातेवाईकांसह पोलिसही चक्रावून गेले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -