Yogini Ekadashi 2021 Date and Time : आषाढ महिन्याच्या एकादशी तिथींना शास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पहिली एकादशी 05 जुलै 2021 रोजी आहे. या एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी व्रत ( उपवास ) ठेवत भगवान विष्णूची उपासना केली जाते. एकादशी उपवास हा सर्व व्रतांमध्ये विशेष आणि अतिशय शुभ मानला जातो.


एकादशी उपवासात नियमांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. एकादशी उपवास हा सर्वात कठीण उपवास मानला जातो. एकादशी उपवासात विशेष नियम आणि शिस्त पाळली पाहिजे. म्हणून इतर उपवासांपेक्षा हा उपवास अधिक कठीण मानला जातो. एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. परंतु या उपवासात काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 


स्वच्छता पाळावी


योगिनी एकादशीच्या व्रतामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. पूजा करण्यापूर्वी पूजास्थळ व्यवस्थित स्वच्छ करावे. त्यानंतरच ही पूजा सुरू करावी.


खोटे बोलू नये


एकादशी व्रत करताना खोटे बोलू नये. या व्रताचे फळ खोटे बोलून प्राप्त होत नाही.


बोलण्यात नम्रता ठेवावी


एकादशी व्रत असताना बोलण्यात गोडपणा आणि नम्रता कायम ठेवावी. कुणालाही दुखवू नये.


दानधर्म करा


एकादशी उपवासात सेवा भावाला विशेष महत्त्व आहे. या उपवासातही दान-धर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे. दानधर्म करावा आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे.  .


चुकीच्या कामांपासून दूर रहा


योगिनी एकादशी व्रत करताना कोणत्याही प्रकारची चुकीची कामे करू नये. मांस, अल्कोहोल इत्यादींचे सेवन या दिवशी अजिबात करू नये.


योगिनी एकादशी व्रत: 5 जुलै, सोमवार


एकादशी तिथीची सुरुवात : 04 जुलै 2021 रोजी सकाळी 07:55 वाजता.
एकादशी तिथी समाप्त : 05 जुलै 2021 रोजी रात्री 10:30 वाजता.


एकादशी व्रताची शुभ मुहूर्त


दुसर्‍या दिवशी मंगळवारी 06 जुलै रोजी योगिनी एकादशी उपवास सोडला जाईल. या दिवशी, सकाळी 05 वाजून 29 मिनिट ते सकाळी 08 वाजून 16 मिनिटपर्यंत उपवास सोडला जाऊ शकतो.