Maharashra Rain News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी (Farmers) बांधव चिंतेत आले आहेत. मान्सूनची (Monsoon) वाटचाल सुरुवातीच्या टप्प्यात खूपच तीव्र होती. पण आता मान्सूनची वाटचाल कमालीची रखडली असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. मात्र, आता पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता, त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. काल राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
विदर्भात अजूनही दमदार पाऊस नाहीच
आतापर्यंत एकदा का होईना राज्यातील जवळपास सर्वच विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पण, विदर्भ याला अपवाद आहे. विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत. खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थबकला असल्याने येथील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. पावसाने ओढ दिल्याने विदर्भ विभागातील अनेक भागात कमाल तापमान वाढल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे.
दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
काही ठिकाणी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच आज भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या दोन जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: