यवतमाळमध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 02:39 AM (IST)
यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर किसन झिताजी राठोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. डॉ. राठोड यांच्याविधोरात तब्बल आठ महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. त्यापैकी दोन महिलांनी अधिकाऱ्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोग्य अधिकाऱ्याला अटक केलेली नाही. डॉक्टर राठोड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्याचबरोबर त्यांचे राजकीय हितसंबंध असल्यानं पोलिसांच्या कारवाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.