यवतमाळ : यवतमाळमधील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक छळाप्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डांना अटक करण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांच्या विशेष पथकाने रात्री साडेतीन वाजता नागपुरातील सोनेगाव परिसरात कारवाई केली.

 

दोन शिक्षकांनी विद्यार्थींनींचं लैगिंक शोषण केल्याचं समोर आल्यापासून पालक आक्रमक झाले होते. मुख्याध्यापक दाससह किशोर दर्डा यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

 

काल दर्डानगरमध्ये संतप्त जमावानं काँग्रेस नेते विजय दर्डा यांच्या विकासकामांच्या फलकांची तोडफोड केली. रस्त्यावर टायरही पेटवून देण्यात आले. त्यानंतर या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
विजय दर्डा अध्यक्ष असलेल्या जवारलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
संतप्त महिला पालकांनी काल किशोर दर्डा यांच्या घरासमोर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत.