Yashwant Sena Candidates List : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणाऱ्या यशवंत सेना (Yashwant Sena) देखील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रिंगणात उतरली आहे. दरम्यान यशवंत सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी (Yashwant Sena Candidates First List) देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माधव पॅटर्न अर्थात माळी-धनगर-वंजारी या समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देऊन महायुतीकडून आखण्यात आलेल्या प्लॅनला यशवंत सेनेच्या निर्णयाने मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


अनेकवेळा आंदोलन, मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, यशवंत सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेचेच्या सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा, रावेर लोकसभा, अहमदनगर लोकसभा, धुळे लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर, या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहेत.


यशवंत सेनेच्या पहिल्या यादीत कुणाला कुठून उमेदवारी?



  • यशवंत सेनेच्या वतीने संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

  • अण्णासाहेब रुपनर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

  • समाधान बाजीराव पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

  • अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून गंगाधर कोळेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

  • धुळे लोकसभा मतदारसंघातून हिरालाल कन्नूर यांना यशवंत सेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत.

  • कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जयसिंग आप्पा सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


सध्याचे सरकार धनगर विरोधी सरकार : दोडतले


मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील धनगर बांधव आंदोलन, मोर्चे काढून आपली मागणी शसन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येत असतो. तर, राजकीय पक्षांकडून याबाबत आश्वासन देखील देण्यात येतात. पण प्रत्यक्षात यावर तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यावरच बोलतांना यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "सध्याचे सरकार हे धनगर विरोधी सरकार असल्याची टिका बाळासाहेब दोडतले यांनी केली असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरूनच सरकारला उत्तर देण्याचा निर्णय यशवंत सेनेने घेतला असल्याचे ते म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


 Madhav Pattern: भाजपचं हुकमी अस्त्र 24 वर्षांनी पुन्हा चर्चेत, माधव पॅटर्न नेमका काय?