सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सांगलीत आता सुरुवात झाली आहे. उमेदवार याद्या निश्चित झाल्यावर प्रचारात रंगत भरणार आहे. प्रचारासाठी मोठी अडचण असते ती कार्यकर्त्यांची. त्यामुळे अनेकांच्या पाया पडून, वेगवेगळे आमिष दाखवत उमेदवार आपल्या प्रचारासाठी फौज उभी करत असतो.
मात्र आता प्रचारासाठी माणसे भाड्याने मिळू लागली तर? अशाच आशयाची जाहिरात सांगलीतील एका बोर्डावर केलेली पाहायला मिळत आहे. ‘आत्ताच सावकार व्हा’, अशा मथळ्याखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, असे एका बोर्डावरती लिहिण्यात आलं आहे. अर्थात ही जाहिरात म्हणजे निव्वळ खोडसाळपणा आहे.
सांगलीच्या हरीपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथील बोर्डावर हा मजकूर लिहिण्यात आला आहे. या अजब जाहिरातीची सध्या सांगली शहरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कार्यकर्ते मिळवणे तशी सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांना जमा करणे, त्यांच्या चहापाण्यापासून इतरही गोष्टींची इच्छा पूर्ण करणे तशी उमेदवाराला डोकेदुखी असते. पण प्रचार करायला आणि आपल्या पाठीशी कार्यकर्त्यांची बळ आहे हे दाखवण्यासाठी त्या उमेदवाराला सर्व सोसावे लागते. पण काही जणांनी चक्क अशी सुविधा उपल्बध करून देत असल्याची जाहिरात केली आहे.
'आताच सावकार व्हा' अशा आशयाखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, हजेरी एक हजार रुपये असा दरही जाहीर करण्यात आला आहे. ट्रक भरुन कार्यकर्ते आणले जात असल्याच्या प्रकारावर या जाहिरातीतून बोट ठेवण्यात आलं आहे.
प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, सांगलीत जाहिरात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2018 03:46 PM (IST)
‘आत्ताच सावकार व्हा’, अशा मथळ्याखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, असे एका बोर्डावरती लिहिण्यात आलं आहे. सोबतच मोबाईल क्रमांकही देण्यात आलाय.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -