सोलापूर : पतीने पत्नीला पोटगी देण्याचे अनेक निकाल आतापर्यंत पाहिले असतील. मात्र पत्नीने पतीला पोटगी देण्याचा आदेश सोलापूर सत्र न्यायालयाने दिला आहे.
किरकोळ कारणावरुन पतीला घरातून हाकलवणाऱ्या मुख्याध्यापिकेला सोलापूर सत्र न्यायालयाने दणका दिला. पतीला महिना दोन हजार रुपयांची पोटगी देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.
धनंजय माने आणि जयदीप माने वकिलांच्या या जोडगोळीने पीडित पतीच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद केला.
घरकाम करताना दूध सांडल्याने मुख्याध्यापक पत्नीने पतीला शिवीगाळ करुन घराबाहेर काढलं. पीडित पतीने पतीच्या अत्याचाराविरोधात कोर्टात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान पतीला महिन्याकाठी दोन हजारांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने पत्नीला दिले आहेत.
हिंदू विवाह कायदा कलम 25
पती किंवा पत्नीकडे उदरनिर्वाहासाठी कोणताच पर्याय नसेल तर न्यायालय प्रकरणान्वये पती किंवा पत्नीला पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देऊ शकतं.