जालना : आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी फोनवर देणं किती महागात पडू शकत, याचा प्रत्यय जालन्यातील एका शिक्षिकेला आला आहे. अज्ञात भामट्याने या शिक्षिकेला बँक कर्मचारी असल्याचं फोनवर सांगून तबल 2 लाख 80 हजाराचा ऑनलाईन गंडा घातला आहे.
जालना शहरातील जवाहर बाग परिसरात राहणाऱ्या हेमाली सियाल आणि हिरेन सियाल या दाम्पत्याला आता हात चोळत पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एका खासगी इंग्रजी माध्यमात मुलांना शिकविणाऱ्या हेमाली सियाल पेशाने शिक्षक आहेत.
एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर त्यांना 18 तारखेला त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण SBI बँकेतून बोलत असल्याचं सांगितलं. शिवाय तुमचं ATM कार्ड रिनिव्हल करायचं असल्याने तुमचा ATM नंबर द्या, अस सांगितलं. हेमाली यांनी समोरच्या व्यक्तीवर कसलीही शंका न घेता बँकेतला माणूस आहे, असं समजून त्याला आपला ATM नंबर दिला. शिवाय समोरच्या व्यक्तीने हेमाली यांना तुमच्या मोबाईलवर जो एसएमएस येईल, त्यातील नंबर आपल्याला सांगण्याची विनंती केली.
हेमाली यांनी त्यांच्या क्रमांकावर आलेला नंबर देखील सांगितला. मात्र तो OTP नंबर असल्याने एक प्रकारे आपल्या तिजोरीची चाचीच आरोपीला देऊन टाकल्या. परिणामी त्यांच्या खात्यातून पावणेतीन लाख रुपये गायब झाले.
हेमाली यांनी मोबाईलवर दिलेल्या माहितीचे परिणाम समजायलाही चार दिवस लागले. हेमाली यांचे पती हिरेन सियाल हे बाहेर गावी होते. दरम्यान, पती आल्यानंतर त्यांनी सर्व हकीगत आपल्या पतीला सांगितली. यांनातर दोघांनी शंका आल्याने त्यांनी जवळचं ATM गाठलं. अकाऊंट तपासलं असता दोघांना धक्काच बसला. खात्यावरून 2 लाख 80 हजाराची रक्कम गायब झाली होती.
अखेर आपली चूक लक्षात आल्याने शेवटचा पर्याय म्हणून या दाम्पत्याने पोलीस स्टेशन गाठलं. तक्रार आणि फिर्याद दिली. अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी 420 आणि माहिती तंत्रज्ञान Act नुसार गुन्हाही दाखल केला आहे.
हेमाली सियाल यांना आलेल्या 18 तारखेच्या फोननंतर पुढील चार दिवसात म्हणजेच 22 जुलैपर्यंत तबल 22 ट्रांजेक्शन वेगवेगळ्या बँकेच्या 8 खात्यातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, आता हेमाली यांच्या या चुकीनंतर पोलीस आरोपीच्या शोध घेण्यात गुंतली आहे.
नोटबंदीनंतर बँक आणि त्या नंतरच्या व्यवहारात अनेक घोटाळे झाले. अज्ञात भामट्यांनी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेकांना हातोहात हात फसवलं. कित्येक ऑनलाईन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा गंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2017 04:54 PM (IST)
आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी फोनवर देणं किती महागात पडू शकत, याचा प्रत्यय जालन्यातील एका शिक्षिकेला आला आहे. अज्ञात भामट्याने या शिक्षिकेला बँक कर्मचारी असल्याचं फोनवर सांगून तबल 2 लाख 80 हजाराचा ऑनलाईन गंडा घातला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -