coronavirus : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओसरत चाललेले कोरोनाचे (Corona) संकट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा गडद होऊ लागले आहे. आता तर कोरोनाने देशभरात नुसता धुमाकूळच घातला आहेत. त्यामुळे ओग्ययंत्रणेसह प्रशासनानेही कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेजुरी (Jejuri) येथील खंडेरायाच्या मंदिरातही आता दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील खंडेरायाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठीचे नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. खंडेरायाच्या गडावर दर्शन घेण्यासाठी आता कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी जाताना दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत घ्यावे लागणार आहे. ज्या भाविकांना खंडेरायाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दाखवायचे आहे. तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल.
मास्क बंधनकारक
कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रमाणपत्रासोबतच प्रत्येक भाविकाला मास्क घालणे बंधणकारक केले आहे. मंदिरात मास्क शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच सुरक्षित अंतर राखणे आणि मंदिर समितीने घालून दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याची माहिती मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी दिली.
देशात कोरोनाचा कहर
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशाची चिंता आणखी वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 325 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
PHOTO : यळकोट यळकोट जय मल्हार! चंपाषष्ठीला खंडेरायाची जेजुरी सजली, डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य
सोन्याची जेजुरी द्राक्षानं मढली, पहा खंडेरायांच्या आरासचे आकर्षक फोटो