चारही बाजूने विजेच्या खांबाभोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. सावगांव बेनकनहळी, मंडोळी, हंगरगा परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी मंडोळी सावगांव रोडवरील पुलाजवळील विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी वायरमन आपला जीव धोक्यात घालून तेथे गेला. विजेच्या खांबाला चारही बाजूने पाण्याने वेढले होते. तरीही धाडसाने वायरमनने दुरुस्ती करून चार गावातील वीज पुरवठा सुरळीत केला.
शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणचं लाखांचं बिल
अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले होते. बेळगाव गोवा मार्गावर देखील मलप्रभा नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा, खांब आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात चोवीस तासात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यातील चाळीस गावांचा खानापूर गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली असून नदी काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Belgaum Rain | मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वायरमनला सॅल्यूट, व्हिडीओ व्हायरल