मालेगावात यंदा भाजपनं तब्बल 27 जागी मुस्लिम उमेदवार दिले आहेत. इथले बहुसंख्य मुस्लिम गोमांस खातात. त्यामुळे सत्तेत आल्यास गोमांस बंदी उठवू, असं आश्वासन भाजपचे उमेदवार देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे तोंडी तलाक हा मुस्लिमांचा आधार असल्याचंही काही भाजप उमेदवारांचं म्हणणं आहे.
मालेगाव महापालिकेसाठी उद्या मतदान
मालेगाव महापालिकेच्या 21 प्रभागातील 83 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. शहरातील सर्व 516 मतदान केंद्रांवर एकूण 3 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यंदा महापालिकेने दिव्यांग मतदारांसाठी खास वाहतुकीची व्यवस्था केली आहे. यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिस बंदोबस्तही तैनात
निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून पोलिस यंत्रणेच्या बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले आहे. एकूण अडीच हजार पोलिस, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या आणि आरसीपीचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.