कोल्हापूर : विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, विकिपीडिया मध्ये ज्याला जे वाटते ते टाकत आहे, पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात ॲक्शन घेतली योग्य, पण ती ॲक्शन कमी असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी म्हटले आहे. यासाठी ट्विटर आणि विकिपीडियावर ॲक्शन घेतली पाहिजे, अशी मागणी शाहू महाराज यांनी केली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजामध्ये आज शिव जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी शाहिर आझाद नायकवडी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रोमांचित झाले. 

Continues below advertisement

शिवाजी महाराजांचे कार्य निश्चितच देशातील सर्वांना सर्वांना मार्गदर्शक होईल

शाहू महाराज म्हणाले की, आज शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. पाच वर्षांनी चारशे वर्षे पूर्ण होतील. शिवाजी महाराजांचे कार्य निश्चितच देशातील सर्वांना सर्वांना मार्गदर्शक होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण एकत्र होवून देश पुढे घेवून जावू शकतो, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आग्रामध्ये शिवजयंती साजरा होते याचा आनंद आहे. आग्र्यातून शिवाजी महाराज निष्ठून बाहेर आले. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं हे उदाहरण आहे. शिवाजी महाराज आग्र्यातून परत कसे आले हे कोणालाच माहीत नाही. या संदर्भात संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

राहुल सोलापूरकर यांनी चुकीचं वक्तव्य केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून निसटले हे निश्चित आहे. औरंगजेबाला पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत त्यांनी राहुल सोलापूरकर यांना फटकारले. 

परवानगी प्रमाणे पुतळे बांधत आहेत का?

शाहू महाराज म्हणाले की, राज्य सरकारने सर्वच पुतळ्यांची दखल घेतली पाहिजे. पुतळे बांधत असताना परवानगीप्रमाणे पुतळे बांधत आहेत का हे तपासले पाहिजे. त्यामध्ये कोणते धातू वापरत आहेत. सिमेंट स्टीलचा दर्जा काय आहे याचा रिपोर्ट तपासला पाहिजे, अशी विनंती शाहू महाराज यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या