हेडलाईन्स
14 एप्रिलपासून सराफा दुकानं उघडणार, महाराष्ट्र सराफ असोसिएशनचा निर्णय
औरंगाबाद : 'एबीपी माझा'च्या बातमीचा परिणाम, जायकवाडीतून पाणी चोरणाऱ्यांवर MIDC पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सुभाष सिसोदे, लक्ष्मण नेहे यांच्या गुन्हा दाखल
---------------------------
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 ते 29 एप्रिल दरम्यान दुष्काळ दौरा करणार, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, औरंगाबादमध्ये जाणार
---------------------------
नाशिकचं अशोक लांडे हत्या प्रकरण, अहमदनगरचे माजी महापौर संदीप कोतकरसह दोन भाऊ आणि वडिलांना जन्मठेपेची शिक्षा
---------------------------
अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश, सात महिला दर्शनाला, राजवाडा पोलिस स्थानकातील बैठकीत निर्णय
---------------------------
लातूर जिल्ह्यातील जमावबंदी कलम रद्द, 144 कलम रद्द केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
---------------------------
#पुणे : सतीश शेट्टी हत्या प्रकरणात दुसरी अटक, तत्कालिन ग्रामीण सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव कौठाळे अटकेत, सीबीआयची कारवाई
---------------------------
काँग्रेस आमदार गोपाळ अग्रवाल यांना झालेल्या मारहाणीवरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ, सरकार मारहाणीचं समर्थन करत नाही, गिरीष बापटांचं स्पष्टीकरण
---------------------------
#मुंबई : मुलुंड पूर्वेच्या हरी ओम नगरमधील डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग
---------------------------
BREAKING - मिरजेतून पाण्याने भरलेल्या 10 वॅगन लातूरकडे रवाना
---------------------------
सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला. हल्ल्याच्या निषेधार्थ डोंगरे समर्थकांचा रास्ता रोको. शेटफळ सोलापूर मार्गावरची वाहतूक रोखली. गंभीर जखमी असलेल्या डोंगरेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु
---------------------------
पिंपरी : देहूगावात साखरपुड्याच्या जेवणातील रबडीतून 70-80 जणांना विषबाधा, बाधितांवर देहू आणि चाकणमधील रुग्णालयात उपचार सुरु
---------------------------
मुंबई : बोरीवली-कांदिवली दरम्यानचा विद्युत पुरवठा सुरळीत, मात्र चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक धिम्या गतीने
---------------------------
मुंबई : बोरीवली-कांदिवली स्टेशनदरम्यान विद्युत पुठवठ्यात बिघाड, पश्चिम रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प
----------------------------
1. देहूरोडमध्ये टोळक्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ, अनेक दुकानांचं आणि वाहनांचं आर्थिक नुकसान, चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
2. राज्यातील दुष्काळाची केंद्राकडून दखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुष्काळ पाहणीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना
3. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी सांगलीकर सरसावले, मिरजेच्या स्टेशनमध्ये पाणी भरण्याचं काम सुरु, सांगलीकरांच्या दातृत्त्वाला आणि रेल्वेच्या कर्तृत्वाला 'माझा'चा सलाम
4. दुष्काळामुळे लातूर आणि नांदेडमधील एक हजार शेतकऱ्यांचं स्थलांतर, मुंबईत घाटकोपरमध्ये संसार थाटला, स्थलांतरीत शेतकऱ्यांना एकनाथ शिंदेंचं मदतीचं आश्वासन
5. फडणवीस सरकार पुन्हा एकदा अडचणीत, चिक्कीनंतर 297 कोटींच्या औषध घोटाळ्याचा आरोप, घोटाळा सिद्ध करण्याचं आरोग्य मंत्र्यांचं आव्हान
6. केरळच्या पुतिंगल मंदिरातील अग्नितांडवात 110 भाविक मृत्यूमुखी, घटनेचा आढावा घेण्यासाठी मोदींची कोल्लमला भेट, मृताच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत
7. दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, 6.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके, हिंदकुश पर्वत रांगांमध्ये भूकंपाचं केंद्र
8. नागपूरमध्ये आज काँग्रेसची विराट सभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीवर्षाचं निमित्ताने सोनिया आणि राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधणार
9. शनी शिंगणापूरनंतर महिलांना अंबाबाईच्या गाभाऱ्यातही प्रवेश देण्यासाठी पुजाऱ्यांची सकारात्मक भूमिका, आज औपचारिक घोषणा होण्याची शक्यता
10. ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनने बॉलिवूड ताऱ्यांची भेट घेतली, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षितसह बातचीत
एबीपी माझा वेब टीम