कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2018 11:37 AM (IST)
पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील कोपरगावमधील खडकी भागात घडली आहे.
शिर्डी : पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील कोपरगावमधील खडकी भागात घडली आहे. धारदार कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी गौरी आणि तीन वर्षाची मुलगी दिदी या दोघींची हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी आरोपी गणेश भिमराव खरात याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. मात्र या हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमध्ये आरोपी गणेशची सासूसुद्धा जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस हत्येचं कारण जाणून घेण्यासाठी आरोपीची कसून चौकशी करत आहेत.