Raj Thackeray: अनेकदा राजकारणी लोक दौऱ्यावर बाहेर भेटीसाठी बाहेर गेल्यानंतर अनेकदा कार्यकर्ते, लोक आलेल्या नेत्याला भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात, या गर्दीवर आणि फोटो काढण्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसात राज्यात दौरे केले त्यावेळी असंख्या महाराष्ठ्र सैनिक मला भेटायला आले, पदाधिकारी होते, पण दौऱ्याचा विषय होता तो चाचपणीचा होता, पण काही ठिकाणी मेळावे लावले, भाषण ठेवली. अर्धात माझं काय काम नव्हतं, भाषण आता सुरू होतील, त्यावेळी माझे अनेक मनसे सैनिक मला भेटायला आले होते, त्यावेळी मी अनेकांना भेटू शकलो नाही. अनेकांना ते फोटो पाहिजे असतात. भारताच्या राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे मला खून माफ करा.ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्यांचा मला खून करायचे आहे असे मिश्कील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.


मी मागे एकदा म्हटलं होतं. राष्ट्रपतींना माझी विनंती आहे. मला एक खून माफ करा, मी ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला मला त्याचा खून करायचा, सर्वांना फोटो देणं शक्य होतं नाही, एकाने त्या दिवशी माझ्या नाकाजवळ कॅमेरा आणला मी म्हटलं आता माझ्या नाकातले केस काढायचे आहेत का? कसाही, कुठेही कॅमेरे धरतात, कशासाठी आणि हे सगळं कशासाठी करतात. काही पदाधिकारी वर्धापनाला फोटो काढतात, त्यांचा वाढदिवस असला तरी फोटो, माझा वाढदिवस असला तरी फोटो, बरं ज्यांचा फोटो नाही त्यांचं समजू शकतो, पण, दरवर्षी तेच फोटो. आहो आजार आहे हा, कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत, कारण मलाही या गोष्टींचा त्रास होतो, अनेकांना होत असेल याचा त्रास, त्यामुळे मी अनेकांना भेटू शकलो नाही, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, मला आपल्याला भेटता आलं नाही, पण पुढच्या वेळी सर्वांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत. 


नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे? 


"राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मला एक खून माफ करा. ज्यांना मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे. सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही हो, एकाने तर त्या दिवशी तोंडाजवळ कॅमेरा आणला. मी म्हटलं नाकातील केस काढायचे आहे का. कशासाठी फोटो. वर्धापन दिन, वाढदिवस असेल तरी फोटो काढतात. एखाद्याचा फोटो नसेल तर समजू शकतो. दरवर्षी फोटो काढतात. हा आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो. पण त्यामुळे मी महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्यावेळी जास्तीत जास्त भेटेन", असे राज ठाकरे म्हणाले.