मुंबई : स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अवाक् करणारे प्रश्न विचारल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र आता शाळेतील प्रश्नपत्रिकेतही असेच आश्चर्यकारक प्रश्न विचारल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? असा प्रश्न चक्क नववीच्या परीक्षेत विचारण्यात आला.
चाचा नेहरु हिंदी हायस्कूल, भिवंडी या शाळेतील नववीच्या शारीरिक शिक्षण अर्थात पीटीच्या लेखी परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला. हा पेपर एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? असा प्रश्न विचारुन तीन पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये प्रियांका, अनुष्का, दीपिका यांची नावं आहेत.
चार दिवसांपूर्वी म्हणजे 13 ऑक्टोबरला पीटीचा पेपर होता.
या प्रश्नाशिवाय क्रीडा क्षेत्रातील विविध प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र परीक्षेत कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव विचारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेत माध्यम क्षेत्रातील सर्वात ग्लॅमर असलेले अँकर कोण, असा प्रश्न विचारला होता.