Continues below advertisement


Rohit Pawar on Devendra Fadnavis News Paper Add: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात तंबू ठोकल्यानंतर सरकार पातळीवर यशस्वी तोडगा काढण्यात आला. सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरमुळे दोन्ही घटकांचे समाधान झाल्याच बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीदिवशी देवाभाऊ अशा राज्याच्या सर्वच दैनिकांमध्ये मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर या जाहिराती झळकल्या. या जाहिराती निनावी पद्धतीने देण्यात आल्याने सोशल मीडियामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जाहिरात प्रसिद्ध करताना सोर्स देणे क्रमप्राप्त असताना या जाहिरातींमध्ये कोणताही सोर्स देण्यात आला नव्हता. त्यामुळे या जाहिराती दिल्या तरी कोणी? असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिरात एका मंत्र्यानं दिल्याचं म्हटल आहे.






भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिली


रोहित पवार यांनी म्हटले आहे की, हा मंत्र भाजपचा नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिलआहे. त्यामुळे या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ते म्हणाले की या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कोठून आल? हा मंत्री कोण? असे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील, असे त्यांनी ट्विट करत म्हटलहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटल आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता.


निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या?


या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.


इतर महत्वाच्या बातम्या