Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे काल (6 सप्टेंबर 2025) अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात विसर्जन (Ganesh immersion 2025) पार पडले. असेअसलेतरी लालबागचा राजाचीविसर्जनमिरवणूकअद्यापवाटेतआहे. सध्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीजवळ दाखलझालीआहे. लालगाबचा राजा ऑपेरा हाऊसवरुन गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झालाय. दहा किलोमीटरच्या अंतरासाठी गेल्या 18 तासांपासूनहिमिरवणूक सुरु आहे. शिवाय यंदा मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा वापरण्यातयेणारआहे.

दरम्यान, आपल्यालाडक्याबाप्पालानिरोप (Mumbai Ganpati Visarjan 2025) देण्यासाठीदेशभरातूनदाखलगणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवरमोठीगर्दीकेलीअसूनसर्वत्रभक्तीचामहासागरबघायलामिळतोआहे. अशातच भायखळा अग्निशमन दलाचा जवानांकडून सायरन वाजवून लालबागचा राजाला अनोख्यापद्धतीने सलामी देण्यात आली. भायखळा परिसरात राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मध्यरात्री तुफान गर्दी बघायलामिळाली. मध्यरात्री मुंबई शहरात जोरदार पाऊस होऊनगेलाय. मात्र या जोरदार पावसामध्येसुद्धा गणेश भक्तांकडून मोठा उत्साहात राजाचा विसर्जन केलं जात असल्याचेचित्र आहे.

भायखळ्यात फायरब्रिगेडकडून बाप्पाला सायरन सॅल्युट

दुसरीकडे, लालबागचा राजाचं थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर आगमन होईल. यानंतर लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल आणि त्याचे विसर्जन होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी अद्याप सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात मोठ्या गणपतींची रिघ लागली आहे. मुंबईत सध्या गणेश विसर्जनाचा सोहळा शिगेला पोहोचला असून संपूर्ण गिरगाव चौपाटीवर भक्तीचा जनसागर लोटला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त चौपाटीवर दाखल होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जनाचा हा महासोहळा इथे पार पडतोय. 

दहा दिवसांच्या उत्साहानंतर बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत आहे. गणेश भक्तांचा उत्साह दिवसभर शिगेला पोहोचलेला दिसला. सकाळपासून मुंबईतील मोठ्या गणपतींच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करत ढोलताशेच्या तालावर नृत्य केले. लालबाग परिसरातून निघालेले बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाले. गिरगाव चौपाटीवर अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईतील मोठे गणपती अजूनही चौपाटीच्या दिशेने येत आहेत. पावसाची उघडझाप सुरू असूनही गणेश भक्तांची गर्दी कायम आहे. पहाटेपर्यंत हा परिसर गजबजलेला राहील अशी माहिती मिळाली आहे. 18 तासांहून अधिक काळ उलटूनही भाविकांचा जल्लोष कमी झालेला नाही.

ही बातमी वाचा: