नागपूर : जयंत पाटील सध्या असंबद्ध झाले आहेत. ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे सध्या असं ते बोलतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. एवढी मोठी निवडणूक चालली आहे, जयंत पाटील कुठे दिसतात का? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार दिसतात. जयंत पाटील आहेत कुठे? ( घराणेशाही तुम्ही समजा) समजदार को इशारा काफी है! अशा शब्दात टोला लगावला. बारामतीमध्ये बोलताना फडणवीस यांनी बारामतीची मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचे म्हटल्यानंतर हे विधान  केल्यानंतर जयंत पाटील यांनी हास्यापद असल्याचे म्हटले होते. 


महाविकास आघाडी म्हणजे केवळ इंजिन असून यांना दिशा नाही. हे तिन्ही इंजिन वेगवेगळ्या दिशेनं जात असल्याची टीका फडणवीस यांनी केली. 


श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर 


दरम्यान, नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नसल्याचे सांगितले. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असल्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले की, महायुतीचे उमेदवार ते असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहणार असून मागील वेळेसपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


आम्ही 33 जागांचा दावा केला नाही 


दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर बोलताना फडणवीस यांनी तीन पक्ष सोबत असल्याचे सांगत तिन्ही पक्षांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असल्याचे म्हणाले. आम्ही 33 जागा आम्ही लढू, असा दावा आम्ही कधीच केला नव्हता. तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्या जागा आपण लढल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या जागा मिळतील, त्यावर समाधानी आहोत. 


इतर महत्वाच्या बातम्या