नागपूर :  महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर आज संपुष्टात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात तरी मिळालेले नाही. तसेच भाजपाचे 12 आमदार निलंबित असताना राज्यपालांची अध्यक्ष निवडणुकीत काय भूमीका असू शकते याचे देखील कुतूहल आहे.


शिवसेनेचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, मात्र काँग्रेसच्या अध्यक्षाचे काय? दोन दिवसाचे अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा अध्यक्ष द्यायला हरकत नव्हती पण मतदान मात्र ओपन बॅलेटने हवे होते. नियमानुसार ते मात्र गुप्त घ्यावे लागणार हे  लक्षात आल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत ह्यावर तिन्ही पक्षांमध्ये बरीच चर्चा झाल्याचे कळतंय. ऑल वेल हे सतत सांगणाऱ्यांना ही गुप्त मतदानाची रिस्क घ्यायची नव्हती असे कळत आहे. 


एकीकडे मतदानाच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील ह्यांनी अपक्ष आमदारांच्या मतदानाची चाचपणी केली. काँग्रेस आपला अध्यक्ष बसावा ह्यासाठी आग्रही होती असे ही कळते. मात्र जेव्हा एकंदरीत गुप्त मतदानच घ्यावे लागेल हे लक्षात आले तेव्हा मुख्यमंत्री ह्यांनी काँग्रेस नेतृत्वाशी दिल्लीत देखील यावर वार्तालाप साधल्याचे कळते आणि अध्यक्षपदाची निवडणूक सध्या दोन दिवसाच्या अधिवेशनात न घेण्याचे ठरले. 



अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया 



  • विधीमंडळ अधिवेशन सुरु असतानाच घ्यावी लागते

  • गुप्त मतदानानीच निवडणूक हा नियम 

  • आमदारांच्या निलंबनामुळे ती थांबू शकत नाही 

  • सदनात असणाऱ्या आमदारांनाच मतदान करता येते


त्यामुळे आता अध्यक्ष निवडणूक ही थेट हिवाळी अधिवेशनातच घेता येणार आहे.  ह्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाले.  अध्यक्ष निवडीत राज्यपालांची नक्की काय भूमिका असू शकते, काय कंगोरे आहेत नियमांचे येत्या निवडणुकीला समजेल. 


संबंधित बातम्या :


Maharashtra Assembly Session 2021 : 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू : देवेंद्र फडणवीस


Uddhav Thackeray : काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे