व्हॉट्सअॅपवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 06:21 PM (IST)
बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हरवले आहेत अशा प्रकारच्या बदनामीकारक पोस्ट व्हॉट्सअॅपवर पसरवल्याप्रकरणी बुलडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्जन इथल्या युवा प्रतिष्ठान या व्हॉटस्अप ग्रुपवरुन ही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रुप अॅडमिन नकुल शिंगणे याच्यावर गुन्हा दाखल केला केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राणा चंद्रशेखर चंदन यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.