मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक जाहिरातीमध्ये (Shiv Sena Advertisement) पॉर्न स्टारचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला. या जाहिरातीत असलेल्या व्यक्तीचे अनेक अश्लील व्हिडीओ उल्लू अॅपवर (Ullu App Video) उपलब्ध आहेत असा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात आता नव्या वादाचा पिक्चर सुरू झाल्याचं दिसतंय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांच्यासाठी मतं मागितली त्या प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर कधी बोलणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. पण चित्रा वाघ यांनी ज्या उल्लू अॅपचा (Ullu App) उल्लेख केलाय ते मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटावर आरोप करताना ज्या उल्लू अॅपचा उल्लेख केला ते नेमकं काय आहे ते पाहूया,
काय आहे उल्लू अॅप? (What Is Ullu App)
उल्लू अॅपवर शेकडो बोल्ड वेबसीरीज, शॉर्ट फिल्म्स, अश्लील चित्रपट उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नाही. अॅपवर लहान मुलांसह ग्राहकांसाठी गुप्तपणे अश्लील कंटेंट पुरवला जातो. महत्त्वाचं म्हणजे वय पडताळणीचं बंधन नसल्याने उल्लू अॅपविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. धोकादायक गोष्ट म्हणजे हे ॲप वापरण्यासाठी KYC म्हणजेच Know Your Customer आवश्यक नाही.
उल्लू अॅपचे सध्या 20 लाखांहून जास्त ग्राहक आहेत. अॅपच्या प्रवर्तकांकडून 120 कोटी रुपयांसाठी आयपीओ ड्राफ्ट दाखल करण्यात आला आहे.
वादग्रस्त असणारे Ullu ॲप Google Play Store आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या ॲपमधून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जातात. यामध्ये लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओंचाही समावेश आहे. या ॲपमधून बाल लैंगिकतेला प्रोत्साहन दिलं जात, शाळकरी मुलांना लक्ष्य केलं जातं.
उल्लू अॅप विरोधात तक्रार (Complaint against Ullu App Video)
गेल्या महिन्यात उल्लू अॅप विरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने (NCPCR) उल्लू ॲपविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारने उल्लू ॲपची चौकशी करावी तसेच उल्लू ॲपवर कारवाई करावी अशी मागणी आयोगाने केली आहे. या ॲपच्या माध्यमातून लहान मुलांसाठी धोकादायक असणारा चुकीचा मजकूर पोस्ट केला जातो असा दावा करण्यात आला आहे.
आधीच कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा अश्लील व्हिडीओंमुळे वादात अडकले आहेत. त्यावरून देशभरात राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलंय. त्यातच आता ठाकरे गटाच्या जाहिरातीवरून नवा वादंग निर्माण झाला. आता या जाहिरातीवरून होणाऱ्या आरोपांचा फोकस कुठपर्यंत पोहोचतो हे बघावं लागेल.
ही बातमी वाचा :