अकोला : शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचं सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय?, असं काहीसा वादग्रस्त सवाल राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलाय. ते अकोला (Akola News) येथे कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. दरम्यान, कृषी विद्यापीठातील स्टॉल धारकांना विद्यापीठाने शुल्क आकारण्याच्या प्रश्नावरही त्यांनी वादग्रस्त उत्तर दिलंय. लोकसहभागातूनच कोणतेही काम पूर्णत्वास जाते. सरकारने फुकट दिले तर मग काहीच काम करायचं नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय. आज अकोल्याच्या कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शन उद्घाटनाचा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आलाय. यावेळी कृषीमंत्र्यांनी मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहिलीय.


कृषी विद्यापीठातील रिक्त जागांसंदर्भात लवकरच निर्णय- माणिकराव कोकाटे


आज झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले की नाही हे स्पष्ट होत नाहीय.‌ त्यामुळे पंचनामे संदर्भात सध्या कोणताही निर्णय घेणार नसल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केलेय. राज्यातील कृषिमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी प्रथमच अकोल्यातील कृषी विद्यापीठाला भेट दिलीय. दरम्यान राज्यातील कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील रिक्त जागांसंदर्भात लवकरच माहिती घेऊन निर्णय घेऊ, असं ही ते म्हणालेय. दरम्यान आपल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही माणिकराव कोकाटे म्हणालेत. छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील, असे ही ते म्हणालेय. 


मागण्यांसाठी वृद्ध महिलेने कृषीमंत्र्याचे पाय धरले 


किसान ब्रिगेडची एक वृद्ध महिला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाया पडली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी कृषीमंत्र्याचे पाय धरत आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्री कोकाटे अकोल्यात आले होते. त्याचवेळी हा प्रकार घडलाय. 


यादरम्यान पोलिसांनी महिलेला बाजूला केलंय, अशातच विदर्भातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी विदर्भातील रोजगार द्या, 12 तास शेतकऱ्यांना विज द्या, अशा किसान ब्रिगेड महिलेच्या प्रामुख्याने मागण्या होत्या.


इतर महत्वाच्या बातम्या