Shravan Bal Yojana : राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सराकारच्या सामाजिक न्याय विभागकडून अनेक योजना (Maharahtra Goverment Schemes) राबवण्यात येतात. त्या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्तीवेतन (Senior Citizens Pension Schemes) देण्यात येते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही त्यापैकीच एक योजना असून त्या माध्यमातून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन देण्यात येतं.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही हा उद्देश ही योजना सुरू करण्यामागे आहे. त्यामाध्यमातून वृद्ध नागरिकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे, त्यांचा आर्थिक विकास करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच या योजनेची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा होते.
योजनेचं नाव - श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
विभाग - सामाजिक न्याय विभाग (Maharashtra Social Justice and Special Assistance Department)
योजनेचे लाभार्थी - (Beneficiary)
65 वर्षांवरील निराधार वृद्ध
आवश्यक कागदपत्रे (Required documents For Shravan Bal Yojana)
- विहीत नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला - किमान 65 वर्ष
- किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
- आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचा फोटो
- उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.21,000/-)
- दारिद्र्यरेषेखालील (BPL) असलेले आणि नसलेलेही यासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ
अर्ज कुठे करावा? (Where To Apply For Shravan Bal Yojana)
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्या. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तहसील कार्यालय, सेतु केंद्र,
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
ही बातमी वाचा: