मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही लोक घरातून बाहेर पडत आहेत. शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुंबईत 18 (आज मध्यरात्री) सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घाबरण्याचे काही कारण नसून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस आदेशात म्हटले आहे.


त्यामुळे आता मुंबईत चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो बारा दिवस जरा जपून, अन्यथा पोलिसांची कारवाईला सामोरे जावे लागेल.


मुंबईत आज (मध्यरात्रीपासून) 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढतचं आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.




  • फौजदारी दंड संहिता 1973च्या कलम 144 अंतर्गत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

  • कोणीही हिंसाचार करू नये, अटीतटीच्या प्रसंगी गर्दी करू नये यासाठी हे कलम लागू करतात.

  • जमावबंदी आदेशानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव असतो.

  • त्याचप्रमाणे हत्यारांची ने-आण करण्यासही मनाई असते.


कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.


संबंधित बातम्या :