नागपूर विधीमंडळ परिसरातल्या उपचार केंद्रात आज विशेष आरोग्य शिबीर आजोयित करण्यात आलं आहे. याठिकाणी आमदारांच्या वजन आणि उंचींच्या प्रमाणात त्यांचं शरीर सदृढ आहे का, हे तपासलं जाणार आहे.
नेत्यांनी शरीर सदृढ ठेवून कामाचा वेग अधिक वाढवावा, अशी यामागची भूमिका आहे.
देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. सध्या देशात सव्वा कोटींपेक्षा अधिक लोकांमध्ये लठ्ठपणाची गंभीर लक्षणं आहेत. त्यामुळ नैराश्य, उमेद नसणं अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वत:चं वजन कमी केलं आहे. यावेळी वजन कमी झाल्याचा फायदा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र मी अजून इतका फिट नाही की दुसऱ्यांना सल्ला द्यावा, असंही त्यांनी नमूद केलं.
तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी चालणं थांबल्यामुळे वजन वाढल्याचं नमूद केलं. आता 86 किलो वजन आहे, पण मला ते 60 किलोवर आणायचं असल्याचंही दरेकरांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षात २५ किलो वजन कमी केले. मी दिलेल्या शेड्युलचे त्यांनी काटेकोर पालन केले. आता त्यांना फार वजन कमी करण्याची गरज नाही, असं डॉक्टर जयश्री तोडकर यांनी सांगितलं.