Positivity Rate : गेल्या आठवड्यातील राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मागील आठवड्यात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा नागपूर जिल्ह्यात आढळून आला आहे. नागपूरमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 45.7 टक्के असल्याचे समोर आले आहे. नागपूरबरोबरच गडचिरोली, नाशिक, पुणे, वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. मागील आठवड्याचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट हा 23 टक्के आहे.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्दी-तापाची साधी लक्षणं असतील तर घरीच उपचार घ्या, अशाही सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनमुळेच हे घडत असून, येत्या दहा दिवसांपर्यंत हीच परिस्थिती राहू शकते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात लोकांनी खूप काळजी घ्यावी आणि घरातच राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पॉझिटिव्हिटी रेट
नागपूर - 45.7
पुणे -42.0
गडचिरोली - 41.9
नाशिक - 40.0
वर्धा - 37.36
अकोला - 35.4
अहमदनगर - 20.0
अमरावती - 26.9
अहमदनगर -35.8
बीड - 13.6
भंडारा - 26.4
बुलडाणा - 13.3
चंद्रपूर - 32.4
धुळे - 20.6
गोंदिया - 25.4
हिंगोली - 21.5
जळगाव - 23.1
जालना - 18.7
कोल्हापूर - 24.7
लातूर - 29.3
मुंबई - 7.2
नांदेड - 34.7
नंदूरबार - 30.7
उस्मानाबाद -25.1
पालघर - 7.5
परभणी - 12.6
रायगड - 16.5
रत्नागिरी -12.0
सांगली - 31.9
सातारा - 29.3
सिंधुदुर्ग - 25.5
सोलापूर - 27.5
ठाणे - 14.0
वाशिम - 36.9
यवतमाळ - 26.5
अशा प्रकारे गेल्या आठवड्यात राज्यातील विविध जिह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट होता. कोरोना रुग्णांचा विचार केला तर काल राज्यात 25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्याचबरोबर काल राज्यात 72 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 2930 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.