Weather Update Today : राज्यात गेले काही दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी (Winter) पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.


राज्यात अवकाळी बरसणार


राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत होता.


थंडीचा जोर वाढला


भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, देशातील काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागात झालेल्या बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीतही तापमानात घसरण्यास सुरूवात झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ झाली आहे.


डोंगराळ भागात बर्फवृष्टी


डोंगराळ भागाच बर्फवृष्टीनंतर तापमानात मोठी घट झाली आहे. लोक सकाळी आणि संध्याकाळी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. थंडीचा जोर वाढल्याने गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज काही मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर डोंगराळ भागातही बर्फवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


हिमाचल प्रदेशातील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली असून, त्यानंतर संपूर्ण भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. आजूबाजूच्या परिसराला थंडीच्या लाटेचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम भागात तापमानात झपाट्याने घट झाली आहे.