Weather Update Today : आज राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी (Monsoon) पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने आज ठाणे (Thane), रायगड (Raigad) सह रत्नागिरीला (Ratnagiri) पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर आजही देशाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


ठाणे, रायगडसह रत्नागिरीत पावसाची हजेरी


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. गुरुवारीही मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. आज ठाणे जिल्ह्याला आयएमडीने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 






मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण


मान्सून (Monsoon) पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यात (Maharashtra) चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Alert) पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान (Rajasthan) मधून पावसाने परतीचा प्रवास सुरु केला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी मान्सून माघारीसाठी (Rain Return) अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी हवामान हळूहळू कोरडे होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून पूर्णपणे माघारी फिरण्याचा अंदाज आहे. 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र


दरम्यान, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या आठवड्याच्या शेवटी पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Mega Block : मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉकचा वीकेंड...हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक, शनिवारी शेवटची लोकल रात्री 9 वाजता