मुंबई : राज्यात जून महिन्याच्या (June) पहिल्या आठवड्यात पावसाची हजेरी (Rain) पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख (Meteorologist Punjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार,अंदमान-निकोबार बेटावर 22 मे रोजी सक्रिय झाला. सध्या मान्सूनसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण निर्माण होत आहे. राज्यात 3 जून रोजी कोकण किनारपट्टी भागात मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावेल. त्यानंतर 3 जून ते 10 जून राज्यात दररोज विविध भागात पाउस पडेल.


या भागात जोरदार पावसाची शक्यता


3 जून रोजी मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस हजेरी लावेल. 3,4, आणि 5 जून दरम्यान, मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.


5 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता


सुरुवातील पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 5 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात आणि नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात 7 जून  ते 11 जून दरम्यान पाऊस हजेरी लावेल. पेरणी करताने चांगला पाउस पडल्यानंतर एक ईतभर ओल गेल्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा, अशा इशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिल्या आहेत.


3 जूनपर्यंत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. त्यानंतर 4 ते 7 जूनदरम्यान, पाऊस पुढे सरकत जालना, बीड, नांदेड हिंगोली, यवतमाळकडे सरकेल. 7 जूननंतर औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, नांदेडमध्ये पाऊस सुरु होईल. 7 जूननंतर पाऊस पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.


आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता


दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अमरावती, हिंगोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. काही भागात हलक्या मध्यम  स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


डोंबिवलीसह राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज