मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा अंदाज आहे.
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. आयएमडीने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाचा जितका आनंद घेता येईल तितका आनंद घ्या.
मान्सूनच्या 10 दिवसांच्या ब्रेकमुळे देशातील बहुतांश ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. अरबी समुद्रावर जमा झालेले मान्सूनचे ढग पुढे सरकत नसल्यानं देशाच्या मुख्य भूमीवर पाऊस पडणार नाही, तर तिकडे बंगालच्या उपसागरावर मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे याचा विपरित परिणाम महाराष्ट्रावर होईल, असा अंदाज आहे.