Nagpur Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक होताना दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. देशभरासह राज्यात विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.(IMD) काल विदर्भात सहा जिल्ह्यात पारा हा 44 अंशांच्या वर होता. आता पुढील दोन अजून उष्णतेची लाट ही कायम राहील असा अंदाज व्यक्त केल्याने सकाळपासूनच अमरावतीमध्ये लोकं डोक्यावर रुमाल, टोपी घालूनच बाहेर पडताना दिसतायत. (Weather Update)
रस्त्यावर शुकशुकाट, उन्हाने जीवाची काहिली
अमरावती शहरात दुपारी 12 वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.. मुख्य चौकात सिग्नलवर हिरवी नेट नसल्याने वाहन धारकांना भर उन्हात उभं राहावं लागतं आहे. नागपूरमध्ये दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात आले मात्र अमरावतीत सिग्नल सुरू असल्याचे नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूरात येत्या तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून आजपासून येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपुर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमानाचा चांगलाच चटका जाणवणार आहे. अकोल्यात आजपासून पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपुरातही पुढील चार दिवस तापमानाचा उद्रेक होणार असून नागरिकांना उन्हापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
विदर्भात कुठे किती तापमान?
आज चंद्रपुरात सलग दुसऱ्या दिवशी 45.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद होत आहे. वर्धा, यवतमाळ, e="गडचिरोली" href="https://marathi.abplive.com/news/nagpur" data-type="interlinkingkeywords">गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 43 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली. वाशिममध्ये 42.5 अंश तापमान नोंदवले गेले. अमरावती जिल्ह्यात 44.6 अंश तापमान नोंदवले गेले. बुलढाणा 39.8 तर जळगावात 42.0 अंश तापमान होते.
हेही वाचा: