Malhar Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सहमतीनेच आम्ही भाजपात (BJP) आलो होतो. अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्याचा गौप्यस्फोट मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी केला. मल्हार पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र आहेत. अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना मल्हार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.  


नेमकं काय म्हणाले मल्हार पाटील?


राष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ. पद्मसिंह पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मल्हार पाटील म्हणाले. अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवले व नंतर ते स्वतः भाजपसोबत आल्याचे मल्हार पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडल्याचे पाटील म्हणाले. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 


धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं


धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्चना पाटली यांचे पुत्र मल्हार पाटील हे प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. गावोगावी त्यांचे दौरे सुरु आहेत. अशातच आज त्यांनी प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याचे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पाटील म्हणाले. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांनीच आम्हाला आधी भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर मागून ते भाजपसोबत आल्याचे मल्हार पाटील म्हणाले. दरम्यान, सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील फाईट ही तगडी समजली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर जहरी टीका करताना या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. आता मतदार कोणाला कौल टाकणार हे येणारा काळच ठरवेल. 


महत्वाच्या बातम्या:


कट्टर शिवसैनिक म्हणणाऱ्या आंधळकरांचा सेनेला धक्का, वंचितकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर