भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, पुजारी नसलेल्या ठिकाणी समुद्राख आर्मी लावून पूजा करतात, अशा शब्दात टीकास्त्र सोडले. राहुल यांनी आपल्या काँग्रेसकडून देण्यात आलेल्या गँरेंटींचा पुनरुच्चार करताना महिला, युवक, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महिलांना हक्काचे महिन्याला 8 हजार 500 रुपये देणार असल्याचेही ते म्हणाले.
सरकार येताच जातीय जणगणना, आर्थिक आणि संस्थात्मक सर्व्हे करणार
राहुल यांनी भंडाऱ्यातील सभेत देशात मागासवर्गीयांना मिळत नसलेल्या हक्कांवर भाष्य केले. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करताच सरकार येताच जातीय जणगणना, आर्थिक आणि संस्थात्मक सर्व्हे करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जातीच्या तुलनेत कोण किती प्रतिनिधीत्व करत आहे याची आकडेवारी देशसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या राष्ट्रपतींना आदिवासी म्हणून त्यांना राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात जाऊ दिलं नाही. तिथे अदानी, अंबानी होते. पण एकही मागासरवर्गीय नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.
कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतिल्या
राहुल यांनी पीएम मोदी यांनी देशामध्ये चेष्ठा लावल्याची टीका केली. कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्याची टीका त्यांनी केली. राहुल यांनी सत्तेत येताच अग्नीवीर योजना घोषणा रद्द करणार असल्याचेही सांगितले. देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ होत असतानाच शेतकऱ्यांचे का होत नाही? अशी विचारणा करताना त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही पहिली कर्जमाफी दिली त्या पद्धतीने कर्जमाफी देऊ, असेही सांगितले.
राहुल म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मोदीजी यांनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवले. मोदीचं सरकार आलं तर अदानींचे शेअरचे भाव वाढतात, हे अदानीचं सरकार आहे. सीबीआय, ईडीचा दबाव आणून मुंबईचं विमानतळ अदानींकडे दिलं आहे. भारतातील सर्व पोर्ट यांच्या हातात आहेत. त्यांनी सांगितले की, देशातील आज 22 असे लोकांकडे जेवढी संपत्ती आहे. तेवढीच संपत्ती या देशातील 70 टक्के लोकांकडे आहे. मोदी धर्म आणि हिंदू मुस्लीम यांच्यावर चर्चा करतात. जीएसटीच्या रुपाने तुमच्याकडील पैसे जातात. तुम्ही तेवढा कर देता, जेवढे गौतम अदानी देतात, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या