कोल्हापूर : कोणत्याही नेत्याने भारतीय जनता पक्षात यावे, म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्या लोकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच लोक रात्री-अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. मी टोपी फेकलेली आहे, ती कोणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपात जाणार नाही, असा खुलासा केला असावा, असा टोला भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.


प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पाटील म्हणाले की, "श्री मुश्रीफ हे सहृदयी माणूस आहेत. अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे नेते भाजपात आले तर चांगलीच गोष्ट आहे."

 "आम्हाला बी भाजपात येऊ द्या की रं" म्हणत कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटलांभोवती गर्दी 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे 10-12 आमदार भारतीय जनता पक्षात येणार आहेत, त्यामध्ये कोल्हापूरमधील एकाही आमदाराचा समावेश नाही, असा खुलासाही पाटील यांनी यावेळी केला.