CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ज्या-ज्या भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्या भागात तातडीनं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) टीम तैनात करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि सर्व जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला अलर्टवर राहण्याच्या सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार
राज्याच्या काही भागात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनानं आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावं अशी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली.
सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा
सध्या महाराष्ट्रासह दक्षिणेकडील काही राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज राहावं अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहेत. या सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, उघडीप दिलेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजपासून राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
महत्त्वाच्या सूचना :