Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह (Unseasonal rain) गारपीट होत असल्याचं चित्र दित आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून, वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे. तसेच 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. तसेच वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तर विदर्भ काही जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस सुरु
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं काही भागात शेती पिकांना फटका बसला आहे. आंबा, लिंबू, भाजीपाला, ज्वारी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं या अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातहच अवकाळी पावसासह गारपीट सुरु आहे. तसेच काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखी घडल्या आहेतय दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, अशा स्थितीतच हवामान विभागानं पुन्हा राज्याततील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या: